चंद्रपुर(का.प्र.): चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी आपले राजकीय व सामाजिक जीवनातील मार्गदर्शक भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी विधान परिषद सदस्य आदरणीय मितेश भांगडिया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांचे स्वागत सत्कार केले.
मितेश भांगडिया यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून आणि समर्पित कार्यातून सर्वसामान्य जनतेच्या विकासाला नवी दिशा मिळत आहे व अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या सहवासात कार्य करण्याचा नेहमीच सन्मान वाटतो असे या प्रसंगी सांगितले.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.चंद्रपूर बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे,बँकेचे संचालक आवेश खान पठाण, गणेश तर्वेकर, रोहित बोम्मावार यांच्यासह चंद्रपूर जिल्हा बँकेचे इतर कर्मचारी व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
Back to top button
कॉपी करू नका.